बेळगाव लाईव्ह : बेळगाव बार असोसिएशनच्या द्वैवार्षिक निवडणुकीत वकील बी. जे. गंगाई यांनी विजय मिळवत अध्यक्षपद पटकावले. शनिवारी बेळगाव येथील कोर्ट परिसरात दिवसभर मतदान प्रक्रिया पार पडली असून रात्री उशिरा निकाल जाहीर करण्यात आला.
अध्यक्षपदासाठी एकूण पाच उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये अॅड. बी. जे. गंगाई यांना 604 मते मिळाली. तर चन्नबसाप्पा बागेवाडी यांना 20, अॅड. शंकर मोरे यांना 394, अॅड. डी. एम. पाटील यांना 373 आणि अॅड. एस. एस. सानिकोप्प यांना 24 मते मिळाली.
उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत वकील पवन पाटील यांनी 514 मते मिळवत विजय मिळवला. त्यांच्या विरोधात वकील श्रीकांत कांबळे यांना 325, वकील शेखर जनमट्टी यांना 273, वकील लक्ष्मण अक्कनवर यांना 141 आणि अखिल यादगुडे यांना 99 मते मिळाली.
महिला गटातून उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत वकील जे. एस. माद्रोळी यांनी 879 मते मिळवत मोठा विजय संपादन केला. या गटात वकील राजेश्वरी हेरेकर यांना 404 मते, तर वकील पूजा पाटील यांना 86 मते मिळाली.
जनरल सेक्रेटरी पदासाठी झालेल्या निवडणुकीत वकील सचिन शिवनांवर यांनी 804 मते मिळवत विजय मिळवला. तर वकील जगदीश शिगेहळळी यांना 286, वकील गुरु सिद्धेश्वर हुल्लेर यांना 257 आणि वीरेश कुमार पुणेद यांना 57 मते मिळाली.
जॉइंट सेक्रेटरी पदासाठी वकील प्रशांत पाटील यांनी 779 मते मिळवत बाजी मारली. या गटात वकील विशाल पाटील यांना 379 आणि वकील संतोष गोंधळी यांना 246 मते मिळाली.

खजिनदार पदासाठी झालेल्या निवडणुकीत वकील निर्मला पाटील यांनी 746 मते मिळवत विजय मिळवला, तर वकील महादेवी सरावर यांना 599 मते मिळून पराभव स्वीकारावा लागला.
मॅनेजमेंट कमिटीतील चार जागांसाठी वकील अभिषेक तारीहाळ (875), वकील जी. ए. हिरेमठ (644), वकील मल्लप्पा होळी (641) आणि वकील वसंत अक्केनावर (627) यांनी विजय मिळवला.
यापूर्वीच बिलो मॅनेजमेंट गटातून तीन महिला वकील बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यामध्ये वकील दीपा मर्डी, वकील राजेश्वरी पाटील आणि वकील ज्योती पट्टणशेट्टी यांचा समावेश आहे.
दरम्यान, या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक अधिकारी म्हणून डी. ए. तिगडी यांनी काम पाहिले.




