Saturday, April 27, 2024

/

प्रशासन नरमले मराठा मोर्चा संयोजकावरील एक खटला रद्द

 belgaum
 सकल मराठा समाजाने आंदोलनाचं हत्यार उपसताच  पोलिसांनी एक केस  रद्द केली आहे सोमवारी सायंकाळी पोलिस आयुक्त कार्यालयात पोलीस खात्याने सकल मराठा मोर्चाच्या संयोजकांवर घातलेल्या दोन खटल्यापैकी आज एक खटला संयोजकांचे जबाब नोंदवून रद्दबादल केला . सकल मराठा मोर्चाच्या दहा संयोजकांवर पोलीस खात्याने मोर्चापूर्वी खटले दाखल केले होते . मोर्चा होण्यापूर्वी आणि नंतर देखील पोलीस उपायुक्तांनी तारखा देत सुनावणी वारंवार पुढे ढकलल्यामुळे सकल मराठा मोर्चाच्या संयोजक आणि कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन खटले मागे घ्या अन्यथा पुन्हा मोर्चा काढावा लागेल असा इशारा दिला होता .

                         इशारा दिल्यावर सोमवारी सायंकाळी पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात सुनावणी झाली . शहापूर पोलिसांनी  १०७ कलमा अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून आठ संयोजकांवर खटला दाखल केला होता . त्या खटल्याची सुनावणी पोलीस उपायुक्तांसमोर झाली आणि तो खटला निकालात काढण्यात आला . दुसरा खटला खडेबाजार पोलिसांनी दहा संयोजकांवर कलम १०८ घातला आहे .भडकावू भाषण केल्याचा पुरावा म्हणून  मोर्चाच्या दिवशी भाषण केलेल्या मराठी भाषणांचा कन्नड अनुवाद करण्यात आला आहे आणि तो पोलीस उपायुक्ता समोर खडेबाजार पोलिसांनी हजर केला आहे .या सीडीच्या अनुवादाबाबत मराठा मोर्चा संयोजकांचे वकील महेश बिर्जे यांनी आक्षेप नोंदवला . सीडी आणि भाषणाचा करण्यात आलेला कन्नड अनुवाद तपासून पाहण्यासाठी आपल्याला वेळ देण्यात यावा अशी मागणी वकिलांनी केली . त्यावर सीडी आणि अनुवाद देण्याचे मान्य करून पोलीस उपायुक्तांनी पुढील सुनावणी 08 Maratha samaj bgmमे रोजी होणार आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.