माध्यमिक शालेय विद्यार्थ्यासाठी तीन दिवशीय कार्यशाळामराठा जागृती निर्माण संघ आणि लिओ कन्सल्टन्सी च्या वतीनं बेळगावातील मराठी इंग्लिश आणि कन्नड माध्यमाच्या माध्यमिक शालेय विध्यार्थ्या साठी तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं आहे. इयत्ता 8 वी ते दहावी पर्यंतच्या विधयार्थ्यासाठी 7 ,8,9एप्रिल रोजी गोपाळराव बिर्जे सभागृह पटवर्धन ले आऊट आदर्श नगर वडगाव येथे या कार्य शाळेचं आयोजन करण्यात आलंय.
या कार्यशाळेत वेळेचं महत्व, व्यक्यिमत्व विकास, ध्यान ,योगा,व्यायामाचे फायदे सांगण्यात येणार असून फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित हे विषय हसता खेळता कस शिकावं याबाबतीत मार्गदर्शन केलं जाणार आहे. यावर अंकुश तारीहाळ बी इ एम टेक , विनय कालकुंदरीकर बी इ एम टेक,जयदीप बिर्जे बी इ एम बी ए, राहुल भांदुर्गे बी इ एम बी ए, सोनाली बिर्जे एम एस सी बी एड,प्रवित्तर लोहार एम एस सी बी एड यां तज्ञा कडून मार्गदर्शन मिळणार आहे याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असं आवाहन गोपाळराव बिर्जे यांनी केलं असून नाव नोंदविण्यासाठी सोनाली बिर्जे मोबाईल 08277639641 संपर्क साधावा असं देखील आवाहन करण्यात आलंय