belgaum

दसऱ्याच्या सुट्टीत आर्यन वॉटर पार्कला पर्यटकांची पसंती

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : दसऱ्याची सुट्टी आणि वीकेंडचा आनंद लुटण्यासाठी बेळगाव शहराजवळील आर्यन वॉटर पार्कमध्ये सध्या पर्यटकांची गर्दी सुरू आहे.

विद्यार्थी, तरुण-तरुणी आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने येथे भेट देत असून, पाण्यातील खेळांसह विविध मनोरंजनाच्या सुविधांचा आनंद घेत आहेत. सुट्टीच्या काळात मित्रपरिवारासोबत धमाल करण्यासाठी आणि कुटुंबीयांसह निवांत वेळ घालवण्यासाठी आर्यन वॉटर पार्ककडे पर्यटकांचा ओढा वाढत आहे.

बेळगाव शहरापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर खानापूर रोडवरील देसूर येथे असलेले आर्यन वॉटर पार्क हे मनोरंजनासाठी एक आकर्षक ठिकाण आहे. येथील २०० मीटर लांबीच्या नव्या वॉटर स्लाईड्स आणि थरारक पेंडुलम स्लाईड पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यासोबतच रेन डान्स आणि रिंग डान्सच्या तालावर मनसोक्त आनंद लुटण्याची संधीही पर्यटकांना मिळत आहे.

 belgaum

लहान मुलांसाठी पाळणा, घसरगुंडी आणि खास गार्डनची व्यवस्था असून, धनुष्यबाण, जम्पिंग जॅक, चेस आणि कॅरम यांसारख्या खेळांचाही आनंद घेता येतो. दर रविवारी आयोजित करण्यात येणारा मॅजिक शो हे येथील आणखी एक आकर्षण आहे.

मनोरंजनासोबतच शाकाहारी आणि मांसाहारी अमर्याद भोजनाची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी एकाच ठिकाणी मनोरंजन आणि भोजनाचा आनंद घेण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

दसऱ्याच्या सुट्टीत किंवा आगामी वीकेंडला बाहेर फिरण्याचा बेत आखत असाल, तर बेळगावजवळील आर्यन वॉटर पार्क, देसूर येथे भेट देऊन सुट्टीचा आनंद द्विगुणित करता येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क : ९८४५५४२७५८,
9341102956
9741424950
9620641658
9845542758

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.