belgaum

11,700 किलो रेशनचा तांदूळ जप्त; ट्रकचालक ताब्यात

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील आझादनगर परिसरात अवैधपणे रेशनचा तांदूळ वाहतूक करणाऱ्या ट्रकवर माळमारुती पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले असून, 11,700 किलो रेशनचा तांदूळ आणि ट्रक असा एकूण 8 लाख 63 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

5 ऑक्टोबर रोजी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे असिस्टंट डायरेक्टर इलियास इमामसाब मुनियार यांनी माळमारुती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सरकारच्या विविध योजनांद्वारे नागरिकांना वितरणासाठी देण्यात आलेला रेशनचा तांदूळ एका लारीतून अवैधपणे वाहतूक केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

तक्रारीनंतर माळमारुती पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर येथील इंडिया गॅरेजजवळ कारवाई केली. यावेळी रेशनचा तांदूळ भरलेल्या टाटा लारीसह चालक विजय नारायण भोसले, रा. वडगाव, ता. माण, जि. सातारा याला ताब्यात घेण्यात आले.

 belgaum

पोलिसांनी 2 लाख 63 हजार 250 रुपये किमतीचा 11,700 किलो रेशनचा तांदूळ आणि 6 लाख रुपये किमतीची टाटा लारी (KA-51/C-5271) असा एकूण 8 लाख 63 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास माळमारुती पोलीस करत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.