belgaum

बेळगाव-दिल्ली विमानसेवेला फटका; इंडिगोकडून फेऱ्यांमध्ये मोठी कपात

0
IndiGo
 belgaum

बेळगाव लाईव्ह : इंडिगो एअरलाइन्सने २५ ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या आगामी हिवाळी वेळापत्रकात बेळगाव विमानतळावरील उड्डाणांच्या वेळा आणि फेऱ्यांमध्ये मोठे बदल केले आहेत. यामध्ये बेळगाव-दिल्ली थेट विमानसेवेला मोठा फटका बसला असून, सध्या सुरू असलेली दैनंदिन सेवा कमी करून ती आठवड्यातून अवघ्या तीन दिवसांवर आणली आहे.

२४ ऑक्टोबरपर्यंत सध्याची दिल्ली विमानसेवा दररोज सुरळीत राहील, मात्र २७ ऑक्टोबरपासून हे विमान केवळ मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशीच उपलब्ध असेल.

यामुळे आठवड्याला होणाऱ्या ७ फेऱ्यांवर थेट कपात होऊन त्या अवघ्या ३ फेऱ्यांवर आल्या आहेत. दुसरीकडे, इतर मार्गांवर मात्र सेवा पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आली आहे.

 belgaum
IndiGo

बेळगाव-बंगळुरू मार्गावर दररोज २ विमाने, बेळगाव-हैदराबाद मार्गावर दररोज १ विमान आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दररोज १ थेट विमान सेवा नव्या वेळेनुसार सुरूच राहणार आहे. तरीही, दिल्लीसारख्या महत्त्वाच्या मार्गावरील फेऱ्या कमी केल्यामुळे बेळगावातील उद्योजक, व्यावसायिक आणि प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

बेळगाव विमानतळाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून हुबळीला अधिक प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप करत स्थानिकांनी या निर्णयावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.