belgaum

डॉ. रवी पाटलांसह २५ जणांवर एफआयआर

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावात बोगस अर्ज सादर करून अल्पसंख्याक मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून भाजप नेते डॉ. रवी पाटील यांच्यासह २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ मधील बीएलओ यांनी मार्केट पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

आरोपींमध्ये भाजप नेते डॉ. रवी पाटील, विजय रुग्णालयाचे कर्मचारी प्रशांत, पुढील मणी आणि शंकर नायक यांच्यासह इतर २५ जणांचा समावेश आहे. काल रात्री उशिरा या प्रकरणाची नोंद पोलीस ठाण्यात झाली.

 belgaum

सुमारे १९८ मुस्लिम मतदारांना लक्ष्य करून त्यांची नावे वगळण्यासाठी बनावट कागदपत्रे आणि चुकीची माहिती सादर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना २२ सप्टेंबर रोजी बेळगावच्या वीरभद्र नगर येथील मतदान केंद्र क्रमांक १९५ आणि १९६ मध्ये घडली होती. जिवंत असलेल्या आणि कायदेशीर हक्क असलेल्या मतदारांची नावे ‘फॉर्म नंबर ७’ चा वापर करून वगळण्याचा प्रयत्न केला जात असताना स्थानिक नागरिकांनी डॉ. रवी पाटील यांच्यासह तिघांना पकडले होते. या घटनेच्या आठ दिवसांनंतर आता बीएलओ यांच्या तक्रारीवरून अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.