belgaum

त्या प्रकरणी प्रकरणी डॉ. रवी पाटील यांची चौकशी;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : मतदार यादीतील नावांवर आक्षेप घेण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या फॉर्म-7 अर्जांच्या प्रकरणात भाजप नेते डॉ. रवी पाटील आज मार्केट पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत चौकशीला पूर्ण सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.

चौकशी पूर्ण झाल्यानंतर डॉ. रवी पाटील यांना जामीन मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यकर्त्यांमार्फत केवळ मतदार यादीतील नावांवर आक्षेप घेण्यासाठी फॉर्म-7 अर्ज BLO कडे जमा करण्यात आले होते, असा दावा त्यांनी केला.

मतदार यादीतून कोणाचेही नाव कमी करण्याचा अधिकार आपल्याकडे नसून, हा अधिकार निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचा आहे, असे डॉ. रवी पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच कोणत्याही विशिष्ट समाजातील मतदारांना लक्ष्य करण्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला.

 belgaum

आपण कोणतीही चूक मान्य केलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपली चूक मान्य केल्याचा दावा चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणावर अनिल बेनके आणि गीता सुतार आदींनी यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली आहे. लवकरच पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकरणाबाबत सविस्तर माहिती देणार असल्याचे डॉ. रवी पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, पक्षाच्या सूचनेनुसार कार्यकर्त्यांनी प्रत्येकी ३० आक्षेप अर्ज जमा करून परत आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. फॉर्म-7द्वारे आक्षेप नोंदवणे आणि प्रत्यक्ष मतदाराचे नाव कमी करणे या दोन वेगळ्या प्रक्रिया असल्याचा दावा त्यांनी केला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.