बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधिमंडळाचे यंदाचे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपासून बेळगावातील सुवर्ण विधानसौध येथे सुरू होणार आहे. ११ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात एकूण १० कामकाजाचे दिवस असणार आहेत.
यापूर्वी हे अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकांची संभाव्य घोषणा लक्षात घेऊन राज्य सरकारने अधिवेशनाच्या तारखांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही सुवर्ण विधानसौध येथे अधिवेशन होणार असून, राज्यातील मंत्री, आमदार आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी बेळगावात दाखल होणार आहेत.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या तयारीला वेग येण्याची शक्यता आहे.




