belgaum

ऐन दिवाळीच्या तोंडावर नंदिनी दूध महागणार!

0
Milk plastic pouch
 belgaum

बेळगाव लाईव्ह : दिवाळीचा सण अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला असताना नंदिनी दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटक मंत्रिमंडळाने दुधाच्या दरात प्रतिलिटर आठ रुपयांची वाढ मंजूर केली असून, नवे दर १ नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय दिलासादायक असला, तरी ऐन दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांची दीर्घकाळापासूनची मागणी आणि त्यांचा लढा लक्षात घेऊन दरवाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महसूल मंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली.

वाढीव आठ रुपयांपैकी सात रुपये थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत, तर एक रुपया दूध संघांच्या व्यवस्थापनासाठी वापरला जाणार आहे. सरकारच्या अनुदानासह शेतकऱ्यांना प्रतिलिटर एकूण ४७ रुपये मिळतील.

 belgaum

दरवाढीमुळे दूध उत्पादकांना आर्थिक दिलासा मिळणार असला, तरी घरगुती वापरासाठी दररोज दूध खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

सणासुदीच्या काळात आधीच वाढलेल्या खर्चात दूध दरवाढीची भर पडणार असल्याने सर्वसामान्य कुटुंबांच्या अर्थसंकल्पावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.