belgaum

बेळगावच्या अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांची बदली

0
Conviction
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायाधीश दर्जाच्या दोन वरिष्ठ न्यायाधीशांच्या अंतर्गत बदल्या आणि नियुक्तीचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार, बेळगावचे दुसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश गंगाधर के. एन. यांची बंगळुरू येथील ‘कर्नाटक जुडिशिअल अकादमी’च्या अतिरिक्त संचालक-२ या पदावर बदली करण्यात आली आहे.

त्यांच्या जागेवर जुडिशिअल अकादमीच्या अतिरिक्त संचालक सईदउन्निसा यांची बेळगाव येथील चौथ्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशपदी (भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटल्यांसाठीचे विशेष न्यायालय) नियुक्ती करण्यात आली आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.