बेळगाव लाईव्ह : मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या बंगळुरू येथील निवासस्थानी सकाळपासून सुरू असलेली अंमलबजावणी संचालनालयाची (ED) झडती अखेर पूर्ण झाली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून झडतीची कारवाई सुरू असताना परिसरात राजकीय वर्तुळाचे लक्ष या कारवाईकडे लागले होते.
सकाळपासून सुरू असलेल्या या कारवाईनंतर सतीश जारकीहोळी निवासस्थानाबाहेर आले. यावेळी त्यांची भेट घेण्यासाठी मोठ्या संख्येने अभिमानी आणि समर्थक दाखल झाले होते. आपल्या नेत्याला प्रत्यक्ष भेटल्यानंतर समर्थकांनी आनंद व्यक्त केला.
सतीश जारकीहोळी यांनीही समर्थकांशी आत्मीयतेने संवाद साधला. यावेळी समर्थकांनी घोषणाबाजी करत आपल्या नेत्याला पाठिंबा दर्शविला.

ईडीची झडती पूर्ण झाल्यानंतर सतीश जारकीहोळी समर्थकांमध्ये दिसल्याने परिसरातील वातावरण काही काळ उत्साहपूर्ण झाले होते. दरम्यान, ईडीच्या कारवाईत नेमके काय निष्पन्न झाले आणि कोणती कागदपत्रे किंवा साहित्य तपासण्यात आले, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
सकाळपासून सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईनंतर आता झडती पूर्ण झाल्याने या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.





