belgaum

बेळगावात दुचाकी चोराला अटक

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दुचाकी चोरीच्या प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. रियान इम्तियाज शेख ऊर्फ रमेश अर्जुन शिंदे (वय ३३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे २ लाख ६५ हजार रुपये किमतीची सात मोटारसायकली आणि एक स्कूटी, अशी एकूण आठ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

खादरवाडी येथील दौलत मनोहर पाटील यांनी आपली मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार ८ सप्टेंबर २०२६ रोजी उद्यमबाग पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

सहाय्यक पोलीस आयुक्त शेखरप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक महांतेश होसपेटी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकाने तपास करत आरोपी रियान शेख ऊर्फ रमेश शिंदे याला ताब्यात घेतले.

 belgaum

पोलिसांच्या चौकशीत आरोपीने बेळगाव शहर तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाहनचोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याच्याकडून सात मोटारसायकली आणि एक स्कूटी जप्त करण्यात आली.

या कारवाईमुळे वाहनचोरीच्या आणखी काही घटनांचा तपास लागण्याची शक्यता असून, आरोपीने आणखी कुठे-कुठे वाहनचोरी केली आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

या कारवाईत पोलीस निरीक्षक महांतेश व्ही. होसपेटी यांच्यासह उद्यमबाग पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. विशेष पथकाच्या कामगिरीचे बेळगाव शहर पोलीस आयुक्त, पोलीस उपआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) आणि पोलीस उपआयुक्त (गुन्हे व वाहतूक) यांनी कौतुक केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.