belgaum

पोलिस श्वानांची ज्येष्ठता व कौशल्य परीक्षा

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक पोलिसांच्या उत्तर विभागातील सहा जिल्ह्यांतील पोलिस श्वान पथकांची ज्येष्ठता व कौशल्य परीक्षा सोमवारी बेळगाव पोलिस परेड मैदानावर पार पडली. या परीक्षेत एकूण १८ पोलिस श्वानांनी सहभाग घेतला. श्वानांना देण्यात आलेले प्रशिक्षण, गुन्ह्यांचा तपास करण्याची क्षमता, शिस्त आणि प्रशिक्षकांच्या आदेशाचे पालन यासह विविध कौशल्यांची चाचणी घेण्यात आली.

बेळगाव, विजयपूर, बागलकोट, हावेरी, हुबळी-धारवाड आणि गदग जिल्ह्यांतील पोलिस श्वान पथके या परीक्षेत सहभागी झाली होती. मुुधोळ हाउंड, जर्मन शेफर्ड, बेल्जियन मॅलिनॉइस, डॉबरमन आणि लॅब्रेडोर आदी जातींच्या श्वानांचा यात समावेश होता.

पोलिस विभागात नार्कोटिक्स, बॉम्ब डिटेक्शन आणि क्राइम डिटेक्शन या विविध विभागांसाठी श्वानांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणाची प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली. यामध्ये ओबिडियन्स टेस्ट, ट्रॅकिंग टेस्ट, मॅन सर्च, बॉम्ब सर्च तसेच वासावरून विविध वस्तू आणि अमली पदार्थ ओळखणे आदी चाचण्यांचा समावेश होता.

गुन्ह्यांचा तपास करताना श्वानांची कार्यक्षमता, दिलेल्या आदेशांचे पालन, वर्तन, शिस्त, वास ओळखण्याची क्षमता आणि संशयितांचा माग काढण्याची क्षमता या बाबींवर परीक्षण करण्यात आले. या विविध चाचण्यांच्या आधारे श्वान पथकांना ग्रेडिंग देण्यात येणार आहे.

 belgaum

पोलिस विभागात किमान दहा वर्षांपर्यंत सेवा बजावू शकणाऱ्या श्वानांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करण्याच्या दृष्टीने ही परीक्षा महत्त्वाची मानली जात आहे. बेळगाव पोलिस परेड मैदानावर झालेल्या या परीक्षेदरम्यान प्रशिक्षकांच्या आदेशानुसार पोलिस श्वानांनी विविध कौशल्यांचे प्रात्यक्षिक सादर केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.