belgaum

सण-उत्सवाच्या नावावर सुरु असलेली उधळपट्टी थांबवा..!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : सणांचे वाढते व्यापारीकरण, अवाढव्य खर्च आणि दिखाऊपणा रोखण्यासाठी हलगा येथील ‘राष्ट्रप्रेमी युवक मंडळ’ यांच्या वतीने नागरिकांना व तरुणांना आत्मपरीक्षण करण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. पैशाची स्पर्धा थांबवा आणि संस्कृती वाचवा, असा स्पष्ट संदेश देत मंडळाने उत्सवाचे मूळ पावित्र्य आणि परंपरा जपण्याची विनंती केली आहे.

याबाबत राष्ट्रप्रेमी युवक मंडळाने निवेदन जारी केले असून या निवेदनात अनेक मुद्द्यांवर विस्तृत स्पष्टीकरण आणि आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये सध्या गावोगावी सुरु असलेल्या श्री दुर्गामाता दौडबाबत देखील एक महत्वपूर्ण संदेश देण्यात आला असून, श्री दुर्गामाता दौड हा केवळ एक सोहळा नसून तरुणांना शिस्त, आरोग्य आणि ऊर्जा देणारा संस्कार आहे.

मात्र, सध्या या दौडीच्या स्वागतासाठी आणि सणांच्या नावाखाली लाखो रुपयांची तात्पुरती सजावट, व्ही.आय.पी. थाट, लाऊडस्पीकरचा दणदणाट आणि फटाक्यांची उधळपट्टी होताना दिसत आहे. ही पैशांची स्पर्धा आणि अहंकाराचा दिखावा थांबवून दौडीच्या मार्गावर केवळ साधे तोरण व सडे-रांगोळी काढून भक्तिभावाने स्वागत करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 belgaum

रस्त्यावरील तात्पुरत्या सजावटीवर, फटाक्यांवर आणि फुलांवर होणारा लाखो रुपयांचा अवाढव्य खर्च थांबवून तोच पैसा समाजातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, वंचित घटकांच्या मदतीसाठी किंवा गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी वापरण्यात यावा, अशी आग्रही भूमिका मंडळाने मांडली आहे.

सण हे समाजाला जोडण्यासाठी असतात, एकमेकांना कमी लेखण्यासाठी किंवा स्पर्धा करण्यासाठी नाहीत, त्यामुळे तरुणांच्या मनात रस्त्यावरील सजावटीपेक्षा राष्ट्रभक्तीची कायमची सजावट करूया, असा मोलाचा संदेश या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.