belgaum

आवक घटल्याने कांद्याच्या दरात मोठी वाढ

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर चांगलेच भडकले आहेत. महाराष्ट्रातून बेळगाव मार्केटमध्ये येणाऱ्या कांद्याचे प्रमाण कमी झाले असून गेल्या पंधरा दिवसांपासून बाजारात कांद्याची आवक सातत्याने घटत आहे.

सध्या श्रावण महिना सुरू असल्याने अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत, तसेच पाठोपाठ गणेशोत्सवाची लगबगही सुरू झाली आहे. अशा सणासुदीच्या दिवसांत कांद्याची मागणी वाढली असतानाच पुरवठा कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे.

बेळगाव एपीएमसी मार्केटमध्ये आज विविध प्रकारच्या कांद्याला प्रतिकिलो २६ रुपयांपासून ते ४८ रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. यामध्ये बारीक गोळी कांदा २६ ते ३० रुपये, गोलटा कांदा ३२ ते ३६ रुपये आणि गोलटा मीडियम ३६ ते ३९ रुपये प्रतिकिलो विकला गेला.

 belgaum

तसेच परफेक्ट मीडियम ३९ ते ४३ रुपये, स्पेशल मीडियम ४३ ते ४५ रुपये, मुकाल गोळा ४४ ते ४५ रुपये तर फुल साईज बंपर गोळा कांद्याला सर्वाधिक म्हणजेच ४६ ते ४८ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला आहे.

कर्नाटकातील स्थानिक कांदा बाजारात येण्यासाठी अजून एक महिना तरी वेळ आहे. त्यामुळे बेळगाव मार्केटमध्ये कांद्याचे हे चढे दर कमीत कमी पुढील एक महिना तरी असेच कायम राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.