belgaum

येळळूर येथे महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्यात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनर्रचना (SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या येळूर विभागाच्या वतीने शुक्रवारी ब्रम्हलिंग मंदिर येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे आणि सीमाभागातील मराठी भाषिकांचे मतदानाचे हक्क अबाधित राखण्यासाठी जनजागृती करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी बंडू शेषराव पाटील होते. यावेळी येळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष दुधप्पा बागेवाडी, सचिव प्रकाश अष्टेकर, उपाध्यक्ष राजू पावले, उपखजिनदार नागेंद्र पाकरे, युवा कार्यकर्ते सागर पाटील तसेच भीमराव पुण्यनवर, प्रकाश पाटील आणि सूरज गोरल यांनी मार्गदर्शन केले.

वक्त्यांनी विशेष मतदार यादी पुनर्रचना (SIR) प्रक्रिया सीमाभागातील मराठी समाजाच्या राजकीय अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत प्रत्येक मराठी नागरिकाने स्वतःचे व कुटुंबातील सदस्यांचे नाव मतदार यादीत अचूक असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन केले.

 belgaum

बैठकीत प्रत्येक मतदान केंद्रावर बूथ लेव्हल कार्यकर्त्यांची (BLA) नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे कार्यकर्ते मराठी मतदारांना आवश्यक मार्गदर्शन करणे, नवीन नावांची नोंदणी करून घेणे तसेच मतदार यादीच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत.

यावेळी शेतकऱ्यांच्या सुविधेसंदर्भातही महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला. सध्या शेतीची कामे सुरू असल्याने शेतातील पायवाटा व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी येळूर ग्रामपंचायतीच्या पंचायत विकास अधिकाऱ्यांना (PDO) निवेदन देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

बैठकीस दयानंद उघडे, भीमराव पुण्यनवर, सुनील देसूरकर, बाळकृष्ण धामणेकर, कृष्णा बिजगरकर, शिवाजी कदम, मल्लाप्पा संभाजीचे, शामभाऊ पाकरे, आनंद कंग्राळकर, बाळकृष्ण पाटील, परशुराम पाटील, भरमण्णा कंग्राळकर, नेताजी गोरल, मल्लाप्पा पाटील, येल्लूप्पा पाटील, प्रदीप देसाई, राहुल सोयभावी, अक्षय देसाई, विनोद पाकरे, परशुराम कुंडेकर, नागेंद्र पाकरे, भुजंग संभाजीचे, प्रकाश पाटील, सचिन साळुंखे, अनिल पाटील, सूरज गोरल, परशुराम कनबरकर, प्रसन्न सुळगेकर, रितेश पावले, नंदकुमार पाटील, बी. एन. मजुककर, सागर पाटील, वैभव कामत यांच्यासह येळूर विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.