belgaum

महिलेवर अत्याचार करून धर्मांतराचा प्रयत्न; आरोपीला जन्मठेप

0
Conviction
 belgaum

बेळगाव लाईव्ह : अनुसूचित जातीतील एका महिलेवर अत्याचार करून तिचे अश्लील फोटो काढत धमकी देत धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी रफीक बेपारी याला बेळगाव येथील तिसऱ्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

या प्रकरणाची नोंद सौंदत्ती पोलीस ठाण्यात झाली होती. न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीवरील सर्व आरोप सिद्ध झाल्याचे नमूद केले.

न्यायालयाने बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपीला जन्मठेप आणि १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये ५ वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपयांचा दंड, तर कर्नाटक धार्मिक स्वातंत्र्य हक्क संरक्षण कायद्यान्वये आणखी ५ वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.

 belgaum

याशिवाय, पीडित महिलेला ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता आर. जी. देवरड्डी यांनी प्रभावी बाजू मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.