belgaum

मोबाईलच्या वादातून मित्राची निर्घृण हत्या; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

0
SP RAMRAJAN
 belgaum

बेळगाव लाईव्ह : मोबाईलच्या किरकोळ वादातून एका ४० वर्षीय व्यक्तीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सौंदत्ती तालुक्यातील चिक्कबुदनूर गावाजवळील लक्ष्मीदेवी मंदिर परिसरात घडली. या प्रकरणातील आरोपीला मुरगोड पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

पोलीस अधीक्षक रामराजन यांनी पत्रकार परिषदेत या घटनेची माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, मृत फकीरप्पा मल्लाप्पा पिड्डेन्नावर (वय ४०, रा. चिक्कबुदनूर) आणि आरोपी मल्लिकार्जुन सिद्धप्पा पूजारी (वय २५, रा. चिक्कबुदनूर) हे दोघे मित्र होते.

आरोपीचा मोबाईल मृत फकीरप्पाकडे असल्याने दोघांमध्ये यापूर्वी वाद झाला होता. शुक्रवारी (१७ जुलै) सायंकाळी फकीरप्पा लक्ष्मीदेवी मंदिराच्या छतावर झोपला असताना आरोपी तेथे पोहोचला आणि मोबाईल परत मागितला. “रात्री देतो,” असे फकीरप्पाने सांगितल्याने दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाला.

 belgaum

या वादाच्या भरात संतापलेल्या आरोपीने मंदिरात अंगार ठेवण्यासाठी वापरला जाणारा दगड उचलून फकीरप्पाच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. गंभीर दुखापतीमुळे फकीरप्पाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या प्रकरणी मृताची पत्नी भारती पिड्डेन्नावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरगोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. बीएनएस २०२३ च्या कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

घटनास्थळी मुरगोड पोलिसांसह रामदुर्गचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीएसपी) यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास मुरगोड पोलीस करत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.