belgaum

खानापूरच्या आमदारांनी काँग्रेसला मदत केली तर आनंदच; अंजली निंबाळकरांचा अप्रत्यक्ष टोला

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :”काँग्रेसची विकासकामे पाहून राज्यातील भाजपचे आमदारही काँग्रेसला मतदान करत असतील, तर ती काँग्रेससाठी अभिमानाची बाब आहे,” असे सूचक वक्तव्य खानापूरच्या माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांनी केले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या आजच्या बेळगाव दौऱ्यादरम्यान त्यांची भेट घेतल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना खानापूरच्या राजकारणासह विधानपरिषद निवडणुकीतील क्रॉस व्होटिंगच्या चर्चेवर माजी आमदार डाॅ. निंबाळकर उपरोक्त सूचक वक्तव्य केले.


निंबाळकर म्हणाल्या की, बेळगावच्या विकासासाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार कटिबद्ध असून उत्तर कर्नाटकातील पूरस्थितीचाही त्यांनी सविस्तर आढावा घेतला. मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या विकासाचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून ही बाब प्रशंसनीय आहे. त्यांच्याशी आज झालेल्या आपल्या भेटी प्रसंगी विकासकामांना गती देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

 belgaum

विधानपरिषद निवडणुकीतील क्रॉस व्होटिंगच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना डॉ. अंजली निंबाळकर यांनी “काँग्रेसची विकासकामे पाहून भाजपचे आमदारही काँग्रेसला मतदान करत असतील, तर ती काँग्रेससाठी अभिमानाची बाब आहे,” असल्याचे नमूद केले. खानापूरच्या विद्यमान आमदारांचे नांव क्रॉस व्होटिंगच्या चर्चेत घेतले जात असल्याबाबत विचारले असता, “जर त्यांनी काँग्रेसला मदत केली असेल तर त्यांचे आभारच,” असे सूचक वक्तव्य निंबाळकर यांनी केले.

यावेळी त्यांनी खानापूरच्या आमदारांच्या एका पूर्वीच्या विधानाचाही उल्लेख केला. “काँग्रेसच्या लोकांनी मदत केली म्हणूनच मला विधानसभेत आघाडी मिळाली,” अशी कबुली एकेकाळी विद्यमान आमदारांनी स्वतः भाषणातून दिली होती, असे सांगून डाॅ. निंबाळकर यांनी भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला.

काँग्रेसमधील नेमके कोणत्या व्यक्तींनी मदत केली, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, “ते महिला होत्या की पुरुष, याची मला माहिती नाही. त्याचे उत्तर खानापूरच्या आमदारांनीच द्यावे,” असे प्रत्युत्तरही त्यांनी दिले. खानापूरच्या राजकारणात क्रॉस व्होटिंगची चर्चा रंगत असताना निंबाळकर यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.