belgaum

बेळगावात अमली पदार्थांविरोधात कारवाई; चौघांना अटक

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात अमली पदार्थ विक्री आणि तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम राबवून हेरॉईन व गांजा जप्त केला आहे. या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.

पहिल्या कारवाईत, सीसीबी विभागाने बसवण कुडची जवळील बास्केटबॉल कोर्ट परिसरात सापळा रचून शिवप्रसाद महादेव ज्योती या २१ वर्षीय तरुणाला अटक केली. त्याच्याकडून ३ लाख रुपये किमतीचे १५.०१ ग्रॅम हेरॉईन आणि मोबाईल जप्त करण्यात आला.

चौकशीत हा माल विनायक (रा. बेळगाव) याने मुंबईच्या सायन-दादर येथील अम्मा कोळीवाडा नावाच्या महिला आरोपीकडून विक्रीसाठी आणल्याचे समोर आले. याप्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 belgaum

दुसऱ्या कारवाईत, काकती पोलिसांनी होनगा इंडस्ट्रियल एरियाजवळ गांजा विकण्याच्या तयारीत असलेल्या भूषण बाळेकुंद्री, आदित्य कांबळे आणि प्रशांत खांडेकर (रा. चंदगड, कोल्हापूर) या तिघांना अटक केली.

त्यांच्याकडून १० हजार रुपयांचा गांजा, मोबाईल आणि एक होंडा सिटी कार असा एकूण ३ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी या यशस्वी कामगिरीबद्दल संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.