belgaum

शेत तळ्यात पडूनशेतकऱ्याचा मृत्यू

0
 belgaum

शेततळ्यात पाय घसरून प्रगतशील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; कक्केरी परिसरात शोककळा

कक्केरी (प्रतिनिधी) : कक्केरी येथील प्रगतशील शेतकरी मल्लय्या दुंडय्या हिरेमठ (वय ५२) यांचा स्वतःच्या शेतातील कृषी तळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे कक्केरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मल्लय्या हिरेमठ हे नेहमीप्रमाणे सकाळी शेतात गेले होते. शेतातील कृषी तळ्याजवळ वाढलेले गवत व कचरा साफ करत असताना त्यांचा पाय घसरला आणि ते तळ्यात पडले. त्यांना पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.

मल्लय्या हिरेमठ यांच्या पश्चात पत्नी भारती (४५), मुलगी ऐश्वर्या (२०) ही बी.एस्सी. नर्सिंगच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असून, मुलगा अक्षय (१७) हा डिप्लोमाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. कुटुंबाचा संपूर्ण उदरनिर्वाह मल्लय्या हिरेमठ यांच्या शेतीवर अवलंबून होता. त्यांच्या नावावर सरकारी बँक तसेच कृषी पतसंस्थेचे लाखो रुपयांचे पीककर्ज असल्याने या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

 belgaum

योगायोगाने २१ जुलै हा ‘शेतकरी हुतात्मा दिन’ असतानाच एका शेतकऱ्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने हा अत्यंत वेदनादायी प्रसंग असल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.

घटनेची माहिती मिळताच शेतकरी नेते यल्लप्पा गुपीत, रमेश वीरापूर, अश्पाक अहमद पटेल, महांतय्या हिरेमठ, चेन्नवीरय्या हिरेमठ, अलेक्झांडर डिसोजा, मारुती पाटील, यल्लेशी कुंभारकोप, शिवाजी अंबडगट्टी आणि यल्लप्पा चन्नापूर यांनी मृताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच शासनाकडे पाठपुरावा करून कुटुंबाला आर्थिक मदत व योग्य भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, या प्रकरणाची नोंद नंदगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक रविकुमार धर्मट्टी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.