belgaum

बेळगाव मराठा सेंटर येथे 3, 4 ऑगस्टला डिएससी भरती मेळावा

0
Maratha centre logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह :मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे येत्या दि. 3 आणि दि. 4 ऑगस्ट 2026 रोजी ‘डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्स’ (डीएससी) मधील ‘सोल्जर जनरल ड्युटी’ (जीडी) आणि ‘सोल्जर क्लर्क’ (एसडी) या पदांसाठी भरती मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.

सदर भरती प्रक्रियेमध्ये मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटमधील (नियमित सैन्य आणि प्रादेशिक सेनेमधील कर्मचाऱ्यांसह) पात्र माजी सैनिकांना सहभागी होता येईल. पात्र उमेदवारांनी रेजिमेंटमध्ये विहित केलेली सेवा पूर्ण केलेली असावी, सेवेतून मुक्त होताना त्यांचे चारित्र्य ‘उत्कृष्ट’ (आदर्शवत) किंवा ‘अतिशय चांगले’ असावे, तसेच त्यांनी वैद्यकीय आणि शिस्तविषयक निकष व डीएससी भरतीसाठी निर्धारित केलेल्या सर्व अटींची पूर्तता केलेली असावी.

‘सोल्जर जीडी’ (जीडी) पदासाठी निवृत्तीनंतर 2 वर्षांच्या आत आणि ‘सोल्जर क्लर्क’ (एसडी) पदासाठी 5 वर्षांच्या आत पुन्हा भरती होणे आवश्यक आहे.

 belgaum
Maratha centre logo

‘सोल्जर जनरल ड्युटी’साठी कमाल वयोमर्यादा 46 वर्षे आणि ‘सोल्जर क्लर्क’साठी 48 वर्षे इतकी आहे. सदर भरती मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 3 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8 वाजता ‘मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर’, बेळगाव येथे उपस्थित राहावे आणि भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रे सोबत आणावीत.

माजी सैनिकांनी ‘संयुक्त शारीरिक चाचणी’साठी (सीपीटी) आपला ‘कॉम्बॅट ड्रेस’ आणि ‘डीएमएस बूट्स’ सोबत आणावेत. पात्रतेचे सविस्तर निकष, आवश्यक कागदपत्रे आणि इतर माहितीसाठी उमेदवारांनी ‘मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर’, बेळगाव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावच्या ऍडज्युटंटनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.