बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती निरीक्षण केंद्राने (KSNDMC) ६ जुलै २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंतचा पावसाचा अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार, १ जुलै ते ६ जुलै या कालावधीत खानापूर तालुक्यात सर्वाधिक 52.4 मिमी, तर रामदुर्गमध्ये सर्वात कमी 1.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
१ जुलै ते ६ जुलै : कुठे किती पाऊस?
- खानापूर – 52.4 मिमी (सर्वाधिक)
- बेळगाव – 24.2 मिमी
- निपाणी – 21.2 मिमी
- हुक्केरी – 15.5 मिमी
- कित्तूर – 14.2 मिमी
- रायबाग – 5.5 मिमी
- बैलहोंगल – 8.7 मिमी
- चिक्कोडी – 11.7 मिमी
- गोकाक – 3.8 मिमी
- कागवाड – 3.7 मिमी
- सौंदत्ती – 3.5 मिमी
- अथणी – 3.3 मिमी
- मुदलगी – 2.7 मिमी
- यरगट्टी – 2.4 मिमी
- रामदुर्ग – 1.4 मिमी (सर्वात कमी)
जिल्ह्याची स्थिती
जिल्ह्यात या कालावधीत सरासरी 13.8 मिमी पाऊस झाला असून, तो सरासरीपेक्षा 182 टक्के अधिक असल्याची नोंद अहवालात करण्यात आली आहे. मात्र तालुकानिहाय पावसात मोठी तफावत दिसून येत असून, काही भागांत मुसळधार तर काही भागांत अत्यल्प पाऊस झाला आहे.




