belgaum

दक्षिणकाशित सोमवारी उत्तम पीकपाण्यासाठी ‘महाआरती’ व ‘गाऱ्हाणे’

0
Kapileshwar temple
Kapileshwar temple belgaum
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावचा बहुसंख्य असलेला मराठा समाज हा कृषिप्रधान असून शेतीवरच येथील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. यंदाच्या हंगामात निसर्गाने बळीराजाला उत्तम साथ द्यावी आणि उत्तम पीकपाणी व्हावे, यासाठी सोमवार, दिनांक २९ जून रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेळगावच्या श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिरात सायंकाळी ७:०० वाजता समस्त मराठा समाजाच्या वतीने देवा चरणी ‘गाऱ्हाणे’ घालून ‘महाआरती’ करण्यात येणार आहे.

Kapileshwar temple
Kapileshwar temple belgaum

या धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव, रमाकांत कोंडुसकर, रणजित चव्हाण पाटील, सागर पाटील, कपिल भोसले,प्रकाश बेळगोजी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.

 belgaum

बळीराजाला उत्तम पीकपाणी मिळावे, हीच यामागची भावना असून सर्व समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.