belgaum

नीट घोटाळ्याविरोधात बेळगावात युवा काँग्रेस विद्यार्थ्यांचे आंदोलन

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: नीट परीक्षा घोटाळ्याच्या निषेधार्थ युवा काँग्रेस आणि विद्यार्थ्यांनी गुरुवारी बेळगावातील राणी चन्नम्मा चौकात जोरदार आंदोलन केले. दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत युवा नेते अमान सेठ यांच्या नेतृत्वाखाली हे निदर्शने पार पडली.

आंदोलकांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. यावेळी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) यांच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलनादरम्यान बोलताना युवा नेते अमान सेठ म्हणाले, “आज येथे पक्षाचा प्रश्न नाही, तर देशातील तरुणांच्या भविष्याचा प्रश्न आहे. एका पेपरफुटीचा नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ झाल्याचा हा गंभीर विषय आहे.”

 belgaum

त्यांनी दावा केला की, गेल्या दहा वर्षांत अनेक पेपरफुटीच्या घटना घडल्या असूनही दोषींवर प्रभावी कारवाई झालेली नाही. तसेच यूजी नीटसारख्या परीक्षेला २० लाखांहून अधिक विद्यार्थी बसत असताना परीक्षा व्यवस्थापनासाठी अत्यल्प कायमस्वरूपी कर्मचारी असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थी अनेक वर्षे मेहनत घेऊन डॉक्टर किंवा अभियंता होण्याचे स्वप्न पाहतात. अशा विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर पुन्हा परीक्षा द्यावी लागण्याची वेळ येणे हा मोठा अन्याय असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांवरील मानसिक ताणाचा मुद्दा उपस्थित केला.

या संपूर्ण प्रकरणातील जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी शेकडो विद्यार्थी आणि युवा काँग्रेसचे कार्यकर्ते ही आंदोलनात सहभागी झाले होते

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.