belgaum

बेळगाव मुंबईतील आंदोलनास शिवसेना UBTचा पाठिंबा

0
Vijay devne
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कन्नड भाषा फलक सक्तीविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने जाहीर केलेल्या आंदोलनांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पूर्ण ताकदीने पाठिंबा जाहीर केला आहे.

२२ जून रोजी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात तसेच २९ जून रोजी मुंबईतील मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ समोर होणाऱ्या धरणे आंदोलनात पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी दिली.


गेल्या काही महिन्यांपासून सीमाभागात कन्नड भाषा फलक सक्ती वाढत असून, या प्रश्नावर महाराष्ट्र शासनाने तातडीने भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

 belgaum

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चाधिकार समितीची बैठक तात्काळ बोलावून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या समस्या आणि कन्नड भाषा संवर्धन कायद्याच्या अंमलबजावणीबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे.

Devne pawar


या पार्श्वभूमीवर समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगडे यांनी २२ जून रोजी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणि २९ जून रोजी मुंबईतील मुख्यमंत्री निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.


विजय देवणे यांनी सांगितले की, मराठी भाषिकांच्या प्रश्नांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्ष नेहमीच ठामपणे उभा राहिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या दोन्ही आंदोलनांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सक्रिय सहभाग नोंदवणार असून सीमाभागातील मराठी जनतेच्या न्याय्य मागण्यांसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.