belgaum

दुचाकी चोरटा गजाआड : 5 मोटरसायकली जप्त

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह:हिरेबागेवाडी पोलिसांनी काल एका दुचाकी चोरट्याला अटक करून त्याच्या जवळील सुमारे 2,55,000 रुपये किमतीच्या 5 मोटरसायकली जप्त केल्या आहेत.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव लक्ष्मण विरुपाक्षी कणबर्गी (वय 31 वर्ष रा. आडिवेप्पण अंकलगी, एम.मल्लापुर रोड ता. गोकाक, जि. बेळगाव) असे आहे.

बेळगाव शहरात अलीकडे घडलेल्या मोटरसायकली चोरी प्रकरणांचा छडा लावण्यासाठी पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि ग्रामीण उपविभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोळेन्नावर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक बी. के. मिटगार यांचा समावेश असलेल्या तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती.

 belgaum

या पथकाने तपासाअंती लक्ष्मण कणबर्गी याला संशयावरून ताब्यात घेतले. त्यावेळी पोलीस चौकशीत लक्ष्मण याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्या जवळील हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत चोरलेल्या 2 लाख 55 हजार रुपये किमतीच्या 5 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.