belgaum

आसिफ सेठ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची मुस्लिम जमात फेडरेशनची मागणी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक मंत्रिमंडळाच्या आगामी पुनर्रचनेत बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांना मंत्रीपद देण्याची मागणी कित्तूर कर्नाटक मुस्लिम जमात फेडरेशनने केली आहे.

यासंदर्भात विविध मागण्यांचे ठराव फेडरेशनच्या बैठकीत मंजूर करण्यात आले. प्रलंबित मागण्यांसाठी बेंगळुरूमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय फेडरेशनने घेतला आहे. किंतूर कर्नाटक विभाग मुस्लिम जमात फेडरेशनच्या बेळगावमधील बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

कर्नाटक राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी पुनर्रचनेत बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांना मंत्रीपद देण्यात यावे, असा ठराव या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.

 belgaum

आमदार आसिफ सेठ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे कित्तूर कर्नाटक मुस्लिम जमात फेडरेशनचे शिष्टमंडळ नेण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या माध्यमातून ही मागणी प्रभावीपणे मांडली जाणार आहे.

बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, फेडरेशनचे शिष्टमंडळ आधी मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेईल. त्यानंतर सतीश जारकीहोळी यांच्याच नेतृत्वात हे शिष्टमंडळ नवनियुक्त मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेण्यासाठी रवाना होईल. या भेटीत आमदार आसिफ सेठ यांच्या मंत्रीपदाबाबत चर्चा केली जाईल.

मंत्री सतीश जारकीहोळी यांना कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्री पद देण्यात यावे, अशी मागणीही फेडरेशनने केली आहे. या मागणीचा आग्रह धरण्यासाठी कित्तूर कर्नाटक मुस्लिम जमात फेडरेशनचे एक विशेष शिष्टमंडळ बेंगळुरूमध्ये मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.