belgaum

आरपीडी क्रॉस जवळ घातक हत्यारांसह तरुण जेरबंद;

0
Tilakwadi ps
 belgaum


बेळगाव लाईव्ह:
सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे. आरपीडी क्रॉस परिसरात संशयास्पद रित्या फिरत असताना ही कारवाई करण्यात आली. वैभव महादेव पोठे (वय २४, रा. महाद्वार रोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरपीडी क्रॉस जवळील सार्वजनिक भागात एक तरुण संशयास्पद रित्या वावरत असल्याची माहिती टिळकवाडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस ठाण्याचे निरीक्षक परशुराम पूजेरी आणि त्यांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत संबंधित तरुणाची झडती घेतली.

यावेळी त्याच्याकडे बेकायदेशीरपणे बाळगलेला लोखंडी चाकू आणि लोखंडी पंच आढळून आला. पोलिसांनी सदर घातक हत्यारे जप्त केली असून आरोपीविरुद्ध आर्म्स ॲक्ट आणि कर्नाटक पोलिस (के.पी.) ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल बेळगाव शहराचे पोलिस आयुक्त आणि पोलिस उपायुक्तांनी संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

 belgaum

क्रिकेट बेटिंग आणि गांजा प्रकरणी कारवाई

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर पोलिसांनी ३१ मे रोजी मार्केट आणि एपीएमसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत क्रिकेट बेटिंग आणि गांजा सेवन करणाऱ्या ७ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

मार्केट पोलिसांनी ऑनलाईन क्रिकेट बेटिंगवर तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. यात भरतेश शाळेजवळून रशीदखान पठाण आणि त्याचा साथीदार मतीन जत्ती, कामत गल्ली क्रॉसवरून सागर होनगेकर, तर मध्यवर्ती बसस्थानकाजवळून रोशनजमीर कुडची या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून वेगवेगळ्या कारवायांमध्ये मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

दुसऱ्या कारवाईत एपीएमसी पोलिसांनी ज्योती नगरजवळ धीरज गोड आणि एपीएमसी मार्केट यार्ड गेटजवळ सचिन पट्टण या दोघांना ताब्यात घेतले. तसेच मार्केट पोलिसांनी बसस्थानकाजवळ श्रेयस पाटील या तरूणाला पकडले. वैद्यकीय तपासणीत या तिघांनी गांजा सेवन केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या यशस्वी कारवाईबद्दल पोलिस आयुक्त आणि उपायुक्तांनी पथकाचे कौतुक केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.