belgaum

आरबीआयच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्षपद बेळगावच्या सुपुत्राला

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावचे सुपुत्र आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागातील निवृत्त अतिरिक्त आयुक्त व विशेष निबंधक दिनेश लक्ष्मणराव ओऊळकर यांची भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एका अत्यंत महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. नागरी सहकारी बँकिंग (UCB) क्षेत्रासाठी ‘मॉडेल बाय-लॉज’ (आदर्श उपविधी) चा मसुदा तयार करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने या विशेष समितीची स्थापना केली आहे.

रिझर्व्ह बँकेच्या मुख्य महाव्यवस्थापक (CGM) सेंटा जॉय यांनी या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केला आहे. सन २०२० मध्ये बँकिंग नियमन कायद्यात (B R Act) झालेल्या सुधारणांच्या पार्श्वभूमीवर, नागरी सहकारी बँकांमध्ये उत्तम प्रशासन, नियमांचे पालन आणि भांडवल उभारणी सुलभ व्हावी या उद्देशाने या समितीची स्थापना करण्यात आली आहे.

या ५ सदस्यीय उच्चस्तरीय समितीत अध्यक्ष म्हणून दिनेश ओऊळकर काम पाहणार असून, समितीला पहिल्या बैठकीपासून तीन महिन्यांच्या आत आपला अहवाल सादर करायचा आहे.

 belgaum

दिनेश ओऊळकर हे महाराष्ट्र शासनाच्या सेवेत एक प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जात होते. विशेष म्हणजे, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या सीमा कक्षात त्यांनी ‘स्पेशल ऑफिसर ऑन ड्युटी’ (विशेष कर्तव्य अधिकारी) म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळली आहे.

तसेच सीमा प्रश्नावरील शासनाच्या तज्ज्ञ समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय नियुक्तीबद्दल बेळगाव आणि सहकार क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.