belgaum

कर्नाटकातील विद्यार्थ्यांना दसऱ्याची १९ दिवसांची सुटी!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह | शिक्षण विभागाचा निर्णय; २२ ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू होणार

कर्नाटक राज्यातील लाखो शालेय विद्यार्थी आणि पालकांसाठी आनंदाची बातमी आहे. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील दसरा सुटीचे वेळापत्रक शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना यंदा सलग १९ दिवसांची सुटी मिळणार आहे.

राज्यातील सरकारी, अनुदानित आणि खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना ही सुटी लागू असणार आहे. वार्षिक शैक्षणिक वेळापत्रकानुसार, ३ ऑक्टोबर २०२६ ते २१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दसरा सुटी राहणार आहे. त्यानंतर २२ ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू होतील.

 belgaum

२ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीची सार्वजनिक सुटी असल्याने विद्यार्थ्यांना सलग सुट्यांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे दसरा सण साजरा करण्यासोबतच सहली आणि कौटुंबिक कार्यक्रमांचे नियोजन करण्याची संधी विद्यार्थी व पालकांना मिळणार आहे.

दरम्यान, शैक्षणिक वेळापत्रकानुसार, दुसरे सत्र २२ ऑक्टोबर २०२६ ते १० एप्रिल २०२७ या कालावधीत होणार आहे. त्यानंतर ११ एप्रिल २०२७ पासून उन्हाळी सुटी सुरू होईल.

स्थानिक हवामान परिस्थिती किंवा अन्य आवश्यकतेनुसार सुटीच्या वेळापत्रकात किरकोळ बदल करण्याचा अधिकार संबंधित जिल्ह्यांच्या उपसंचालकांना देण्यात आला आहे.

शिक्षण विभागाच्या या घोषणेमुळे दसरा सण आणि पर्यटनाचे नियोजन करणाऱ्या विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.