belgaum

प्रवीण मजुकर ठरला ‘श्री गणेश २०२६’

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशनतर्फे आयोजित २२ व्या ‘श्री गणेश २०२६’ जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रवीण मजुकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करत ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ हा मानाचा किताब पटकाविला. तर उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू ओमकार पाटील यांनी प्रभावी पोझिंग सादरीकरणाच्या जोरावर ‘बेस्ट पोझर’चा बहुमान मिळविला.

अनगोळ येथील रामनाथ मंगल कार्यालयात पार पडलेल्या या स्पर्धेत विविध वजनी गटांतील शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेतला. स्पर्धकांनी पिळदार शरीरयष्टी आणि आकर्षक पोझिंगचे प्रदर्शन करत उपस्थित क्रीडाप्रेमींची दाद मिळवली.

अंतिम फेरीत प्रवीण मजुकर यांचा बाजी

‘श्री गणेश २०२६’ या सर्वोच्च किताबासाठी ऋत्विक लाखे, श्रीहरी बेळगावकर, विकास शहापूरकर, सुनील भातकांडे, प्रवीण मजुकर आणि राहुल कुलाल यांच्यात अंतिम फेरीत चुरस रंगली. सर्व स्पर्धकांनी एकापेक्षा एक सरस पोझिंग सादर करत प्रेक्षकांकडून टाळ्यांची शाबासकी मिळवली. अखेर उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर प्रवीण मजुकर यांनी ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’चा किताब पटकाविला.

 belgaum

दरम्यान, प्रभावी सादरीकरणासाठी ओमकार पाटील यांना ‘बेस्ट पोझर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

विविध वजनी गटांतील विजेते

स्पर्धेत विविध वजनी गटांत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या शरीरसौष्ठवपटूंची नावे पुढीलप्रमाणे :

वजनी गटप्रथम क्रमांक
५५ किलोऋत्विक लाखे (रॉयल फिटनेस)
६० किलोश्रीहरी बेळगावकर
६५ किलोविकास शहापूरकर (रॉ फिटनेस)
७० किलोसुनील भातकांडे (पॉलीहायड्रॉल जिम)
७५ किलोप्रवीण मजुकर (एमएलआयआरसी)
७५ किलोवरीलराहुल कुलाल (नेक्स्ट फिटनेस)

विजेत्यांचा रोख पारितोषिके आणि पदकांनी सन्मान

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश पोतदार, श्रीधर शेट्टी, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, उद्योजक मिहीर पोतदार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके आणि पदके देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी गौतम सामंत, नवीनकुमार, सुहास चांडक, ईश्वर घाडी, विजय तलवार, सचिन उसुलकर, सदानंद शिरोडकर, शेखर नागरडोळेकर, राकेश कलघटगी, ‘मिस्टर इंडिया’ सुनील आपटेकर, किशोर आगा, सचिन हंगिरगेकर, अमित किल्लेकर, गंगाधर व हेमंत हावळ तसेच आशिया पंच अजित सिद्दण्णावर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

🏆 सर्व वजनी गटांतील प्रमुख निकाल

५५ किलो गट

विजेता

ऋत्विक लाखे

द्वितीय : केतन भातकांडे • तृतीय : पांडुरंग पाटील

६० किलो गट

श्रीहरी बेळगावकर

द्वितीय : रोहित माळवी • तृतीय : गणेश सानोलकर

६५ किलो गट

विकास शहापूरकर

द्वितीय : पंकज गुरव • तृतीय : अक्षय मधुकर

७० किलो गट

सुनील भातकांडे

द्वितीय : विशाल • तृतीय : ओम पाटील

७५ किलो गट

प्रवीण मजुकर

द्वितीय : नागेंद्र मडिवाळ • तृतीय : गजानन पाटील

७५ किलोवरील गट

राहुल कुलाल

द्वितीय : अमर गुरव • तृतीय : गजानन काकतीकर

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.