belgaum

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक मार्गांत बदल

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये अनंत चतुर्दशीनिमित्त निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर आणि परिसरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मार्गांत बदल केला आहे. २५ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत हे नवे वाहतूक नियम व पर्यायी मार्ग लागू राहतील.

मिरवणुकीचा मुख्य मार्ग चन्नम्मा सर्कलकडून सुरू होऊन कॉलेज रस्ता, पिंपळ कट्टा, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, एन. डी. सिग्नल, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, हेमू कलानी चौक, शनी मंदिर, कपिलेश्वर उड्डाणपूल आणि कपिलेश्वर रोड मार्गे कपिलेश्वर तलावापर्यंत निश्चित करण्यात आला आहे.

या कालावधीत शहरात येणारी आणि बाहेर जाणारी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी विविध पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत:

 belgaum

किला तलाव, सम्राट अशोक चौक , आरटीओ सर्कल आणि चन्नम्मा सर्कल मार्गे खानापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी:संगोळी रायन्ना चौकापासून एसपी ऑफिस रोड , कृष्णदेवराय चौक, सदाशिव नगर, लक्ष्मी कॉम्प्लेक्स, विश्वेश्वरय्या नगर बाजी प्रभु मार्ग, गांधी सर्कल, शौर्य चौक, केंद्रीय विद्यालय क्र. २, शर्कत पार्क, सिंझो बंगला, सेंट पॉल्स हायस्कूल, मिलिटरी महादेव मंदिर क्रॉस मार्गे खानापूर रस्त्याला मिळून पुढे जावे.

गोगटे सर्कल रेल्वे ओव्हरब्रिज रस्त्याने बेळगाव शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांसाठी:
गोगटे वर्तुळात डावीकडे वळून काँग्रेस रस्ता, मिलिटरी महादेव मंदिर, सेंट पॉल्स हायस्कूल, सिंझो बंगला, शर्कत पार्क, केंद्रीय विद्यालय क्र. २, शौर्य चौक, हिंडलगा गणेश मंदिर, हनुमान नगर डबल रोड मार्गे बॉक्साईट रोडने प्रवास करावा.

गोगटे सर्कल कडून रेल्वे स्टेशन, हेड पोलिस ऑफिस आणि जुना पीबी रस्त्याकडे जाणारी वाहने: गोवावेस, नाथाजी नगर सर्कल, खासबाग बसवेश्वर सर्कल आणि संभाजी गल्ली मार्गे प्रवास करतील.
नाथ पै सर्कल कडून बँक ऑफ इंडिया आणि एसपीएम रस्त्याकडे जाणारी वाहने:खासबाग बसवेश्वर सर्कल आणि संभाजी गल्ली मार्गे वळवण्यात आली आहेत.

जीजामाता सर्कलपासून देशपांडे पेट्रोल पंप, नरगुंदकर भावे चौक आणि पाटील गल्लीकडे जाणारी वाहने: जीजामाता सर्कलपासून थेट मध्यवर्ती बस स्थानक किंवा व्हॉटसन शो रूम मार्गे जुन्या पीबी रोडने प्रवास करतील.

जुन्या पीबी रोडवरून व्ही.आर.एल. लॉजिस्टिक्स आणि भातकांडे स्कूलकडे जाणारी वाहने:
संभाजी गल्ली रस्त्याचा वापर करून बसवेश्वर वृत्त, खासबाग आणि नाथाजी नगर मार्गे जातील.

जुन्या पीबी रोडवरून यश रुग्णालय आणि कपिलेश्वर मंदिराकडे जाणारी वाहने:
यश रुग्णालयाजवळ डावीकडे वळून व्ही.आर.एल. लॉजिस्टिक्स मार्गे जुन्या पीबी रस्त्याला मिळतील.

गुड्स शेड रस्त्यावरून कपिलेश्वर उड्डाणपुलाकडे जाणारी वाहने:
एसपीएम रोड, मराठा मंदिर आणि गोवावेस सर्कल मार्गे प्रवास करतील.

विसर्जन मिरवणुकीच्या कालावधीत शहरात सर्व प्रकारच्या अवजड वाहनांच्या प्रवेशास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

नो पार्किंग झोन
२५ सप्टेंबर रोजी दुपारी २ पासून मुख्य मिरवणूक मार्ग असलेल्या काकतीवेस रोड , गणपती गल्ली रस्ता, चन्नम्मा सर्कल ते मुख्य मिरवणूक मार्ग, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, यंदे खूट, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, हेमू कलानी चौक, शनी मंदिर, कपिलेश्वर उड्डाणपूल तसेच कपिलेश्वर मंदिराच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांवर सर्व प्रकारच्या वाहनांच्या पार्किंगवर कडक बंदी घालण्यात आली आहे.

नागरिकांसाठी निश्चित केलेली पार्किंगची ठिकाणे:
देशपांडे वाडा ते गांधी सर्कल दरम्यानचा वेंगुर्ला रस्ता, डेअरी फार्मची जागा (सेंट झेव्हियर्स स्कूल शेजारी), महिला पोलिस ठाण्यामागील मोकळी जागा, सरदार मैदान, न्यायालय परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, भरतेश शिक्षण संस्थेसमोरील कॅन्टोन्मेंट पार्किंगची जागा, संभाजी उद्यान आणि जुन्या भाजी मार्केट जवळील मुजावर कोर्ट जवळ पार्किंगची सोय करण्यात आली आहे.

नागरिकांनी आणि वाहनधारकांनी या वाहतूक बदलांची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.