बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात अमली पदार्थ आणि सार्वजनिक ठिकाणी मद्य सेवन केल्याप्रकरणी पोलिसांनी वेगवेगळ्या ठाण्यांत सहा गुन्हे दाखल करून संबंधितांवर कारवाई केली आहे.
टिळकवाडी पोलिसांनी अनगोळ जटपट कॉलनी परिसरात सार्वजनिक ठिकाणी असहज वर्तन करणाऱ्या रमेश नागप्पा भजंत्री याच्या वैद्यकीय तपासणीत अमली पदार्थ सेवन केल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मार्केट पोलिसांनी सेंट्रल बस स्टँड सर्कल येथे अर्मान मल्लिकजान नधाफ, वीरभद्र नगर सातव्या क्रॉस येथे अफ्फान आरीफ जाफर आणि कोडला क्रॉस येथे तौफिक शण्णीरहृद घोरीखान या तिघांना अमली पदार्थ सेवन केल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
कॅम्प पोलिसांनी कॅम्पमधील गवळी गल्लीतील कल्याण स्वीट्सजवळ आसिम निसार पानवाले याच्यावर अमली पदार्थ सेवनाप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
मार्केट पोलिसांनी समर्थ नगर नाल्याजवळ सार्वजनिक ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या प्रशांत हूवप्पा पावळे याच्यावर अबकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. संबंधित कारवाया करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी कौतुक केले आहे.




