belgaum

अनैतिक संबंधातून वाद; महिलेच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या

0
Chikodi
 belgaum

बेळगाव लाईव्ह: अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या वादातून महिलेच्या डोक्यावर दगड घालून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना चिक्कोडी शहराच्या बाहेरील भागात घडली आहे. ऐरावती खोत (वय ४०, रा. नंदिवाडी, जि. बेळगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऐरावती खोत आणि संजू नामक व्यक्ती यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही एकाच हॉटेलमध्ये काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, संजू दुसरे लग्न करण्याच्या तयारीत असल्याचे समजल्यानंतर ऐरावतीने त्याला विरोध केला होता. याच कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला असावा आणि त्यातूनच तिची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

 belgaum

आरोपीने महिलेच्या डोक्यावर दगड घालून तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे चिक्कोडी परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच चिक्कोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी चिक्कोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुढील तपास सुरू असून, हत्येमागील नेमके कारण आणि आरोपीची भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.