belgaum

आरटीओ चलनाच्या नावाखाली सायबर फसवणूक

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात आणखी एक सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून, आरटीओ चलन भरण्याच्या नावाखाली व्हॉट्सअॅपवर पाठविण्यात आलेली एपीके (APK) फाइल डाउनलोड केल्याने मोबाईल हॅक होऊन बँक खात्यातील 2 लाख 44 हजार 791 रुपये लंपास करण्यात आल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी रायबाग तालुक्यातील बोरगाव येथील मूळ रहिवासी आणि सध्या गोकाक येथे वास्तव्यास असलेले गजानन उमराणी यांनी जिल्हा सायबर गुन्हे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गजानन उमराणी यांच्या मोबाईलवर आरटीओ चलन भरण्याबाबतचा संदेश व्हॉट्सअॅपद्वारे आला होता. चलनाची माहिती तपासण्याच्या बहाण्याने त्यांना एक एपीके फाइल पाठविण्यात आली. त्यांनी ती फाइल डाउनलोड करून मोबाईलमध्ये इन्स्टॉल केली.

 belgaum

यानंतर सायबर भामट्यांनी त्यांच्या मोबाईलवरील नियंत्रण मिळवत बँक खात्याची माहिती हस्तगत केली. काही क्षणांतच त्यांच्या खात्यातील 2 लाख 44 हजार 791 रुपये विविध अज्ञात खात्यांमध्ये वर्ग करण्यात आले.

खात्यातून पैसे वजा झाल्याचे संदेश आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे गजानन उमराणी यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने जिल्हा सायबर गुन्हे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

दरम्यान, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, रक्कम ज्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली त्यांची माहिती गोळा केली जात आहे. तसेच एपीके फाइलच्या माध्यमातून मोबाईल हॅक करणाऱ्या सायबर टोळीचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.