belgaum

शिवाजीनगरचा गणेशोत्सव खास! मुक्तिनाथपासून ९

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: छत्रपती शिवाजी महाराज नगरात यंदाचा गणेशोत्सव विविध धार्मिक आणि ऐतिहासिक देखाव्यांमुळे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. परिसरातील पाच सार्वजनिक गणेश मंडळांनी वेगवेगळ्या संकल्पनांवर भव्य देखावे साकारले असून, ते पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

शिवाजीनगर पाचवी गल्लीतील गणेश मंडळाने नेपाळमधील प्रसिद्ध मुक्तिनाथ मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. १०८ गोमुखांतून जलप्रवाह आणि त्यानंतर मिळणारी मुक्ती, अशी संकल्पना या देखाव्यात मांडण्यात आली आहे. धार्मिक महत्त्व असलेल्या मुक्तिनाथ मंदिराची प्रतिकृती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

शिवाजीनगर तिसरी गल्लीतील गणेश मंडळ यंदा ५०व्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. या विशेष वर्षानिमित्त मंडळाने अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिराची भव्य प्रतिकृती उभारली आहे. मंदिराची रचना आणि सजावट पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

 belgaum

शिवाजीनगर दुसरी गल्लीतील ‘बेळगावचा राजाधिराज’ गणेश मंडळाने कावळेश्वर मठातील श्री शिवलिंगावर आधारित देखावा सादर केला आहे. हा देखावा साकारण्यासाठी कार्यकर्त्यांनी सुमारे दोन महिने मेहनत घेतली. त्यांच्या परिश्रमातून गल्लीत भव्य शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे.

‘बेळगावचा अधिपती’ गणेश मंडळाने गणेशोत्सवाच्या माध्यमातून नऊ शक्तीपीठांचा देखावा साकारला आहे. सुमारे दीड महिन्यांच्या मेहनतीतून कार्यकर्त्यांनी नऊ शक्तीपीठांची मंदिरे उभारली आहेत.

दरम्यान, शिवाजीनगर पहिली गल्लीतील ‘बेळगावचा गणाधीश’ गणेश मंडळाने केदारेश्वर गुहा आणि हरिश्चंद्रगडावर आधारित देखावा सादर केला आहे. धार्मिक आणि ऐतिहासिक वारशाची सांगड घालणाऱ्या या देखाव्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.

पाचही मंडळांच्या देखाव्यांमधून कार्यकर्त्यांची कल्पकता, मेहनत आणि धार्मिक श्रद्धा दिसून येत असून, यंदाचा शिवाजीनगरचा गणेशोत्सव बेळगावकरांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.