belgaum

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बेळगावात सेवा संकल्प अभियान

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने बेळगावात महिनाभर चालणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियाना’चा शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत बेळगाव शहरासह जिल्ह्यात विविध सामाजिक व लोककल्याणाची कामे हाती घेतली जाणार असल्याची माहिती भाजप नेते किरण जाधव यांनी दिली.

अभियानाची सुरुवात गणेश मंदिरात विशेष पूजा आणि अभिषेकाने करण्यात आली. याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांना दीर्घायुष्य लाभावे आणि भारताची जगभरात प्रतिष्ठा वाढावी, अशी प्रार्थना करण्यात आली. या कार्यक्रमाला खासदार जगदीश शेट्टर, माजी आमदार संजय पाटील, माजी आमदार अनिल बेनके आणि जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या अभियानांतर्गत गोपूजा करण्यात आली तसेच जिल्हा रुग्णालयात जाऊन रुग्णांना, विशेषतः महिलांना फळांचे वाटप करण्यात आले. याशिवाय दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना लागणारी उपकरणे, वाहने आणि मदत साहित्याचे वितरण करण्यात आले.

 belgaum

येत्या महिनाभरात महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, अनाथ बालकांसाठी भोजन व्यवस्था आणि पर्यावरण रक्षणासाठी व्यापक वृक्षारोपण मोहीम राबवली जाणार आहे. तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनांपासून वंचित राहिलेल्या घटकांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी ठिकठिकाणी माहिती स्टॉल्स उभारले जाणार आहेत.

बेळगावच्या प्रसिद्ध गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीतही सर्व कार्यकर्ते सक्रिय सहभागी होणार आहेत. या सर्व लोकोपयोगी उपक्रमांची माहिती माध्यमांनी जनतेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन भाजप नेते किरण जाधव यांनी केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.