belgaum

क्रीडा विज्ञानात पीएच.डी.; डॉ. प्रशांत मंकाळे यांची उल्लेखनीय कामगिरी

0
 belgaum


बेळगाव लाईव्ह :
हॉकी बेळगावचे सदस्य तसेच क्रीडा प्राध्यापक डॉ. प्रशांत मंकाळे यांनी क्रीडा विज्ञान विषयात पीएच.डी. पदवी संपादन करून उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यांच्या या शैक्षणिक कामगिरीबद्दल हॉकी बेलगाव परिवारातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.


डॉ. मंकाळे यांचा संशोधन प्रबंध “कर्नाटकातील निवडक विद्यापीठांतील हॉकी खेळाडूंच्या खेळाशी संबंधित शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक क्षमता आणि शरीररचनात्मक घटकांचा अभ्यास” या विषयावर आधारित आहे. या संशोधनाद्वारे हॉकी खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम करणाऱ्या विविध घटकांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे.


क्रीडा शिक्षण आणि हॉकीच्या विकासासाठी उपयुक्त ठरणारे हे संशोधन असल्याचे मानले जात आहे. सातत्यपूर्ण परिश्रम, संशोधनाची आवड आणि शैक्षणिक उत्कृष्टतेच्या बळावर डॉ. मंकाळे यांनी विद्यार्थी, खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडा क्षेत्रातील अभ्यासकांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

 belgaum


डॉ. मंकाळे यांच्या या यशाबद्दल हॉकी बेलगावचे संचालक, पदाधिकारी, सदस्य, प्रशिक्षक आणि खेळाडूंनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत, त्यांचे ज्ञान आणि संशोधन भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा देईल तसेच क्रीडा शिक्षण आणि हॉकी क्षेत्राच्या विकासासाठी मोलाचे ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.


डॉ. प्रशांत मंकाळे यांच्या या यशामुळे हॉकी बेलगाव परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या कार्याचा सर्वत्र गौरव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.