belgaum

इन्स्टाग्रामवर खासगी व्हिडिओ अपलोड; अज्ञाताविरुद्ध सायबर गुन्हा दाखल

0
 belgaum


बेळगाव लाईव्ह : इन्स्टाग्रामवर इतरांच्या खासगी व्हिडिओंचे प्रसारण करून गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध जिल्हा सायबर गुन्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘सिंपल स्वीन’ नावाच्या इन्स्टाग्राम खात्यावर 26 जानेवारी रोजी एका अल्पवयीन मुलीचा तसेच एका जोडप्याचा खासगी व्हिडिओ लिंकद्वारे अपलोड करण्यात आला होता. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने पीडितांच्या गोपनीयतेला धक्का बसला आहे.


या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हा सायबर गुन्हे शाखेने अज्ञात खातेदाराविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. संबंधित इन्स्टाग्राम खाते कोणाच्या ताब्यात आहे, व्हिडिओ कोणी आणि कुठून अपलोड केले याचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे.

 belgaum


सायबर पोलिसांनी सोशल मीडियाचा गैरवापर करून इतरांच्या खासगी माहितीचा प्रसार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे. सध्या आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास जिल्हा सायबर गुन्हे पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.