बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारने अल्पवयीन मद्यपानाविरुद्ध राज्यव्यापी कारवाईचे आदेश दिले असून सर्व पब, बार, ब्रुअरी, क्लब, लाउंज, रेस्टॉरंट आणि इतर मद्यविक्री करणाऱ्या आस्थापनांमध्ये वयाची कडक पडताळणी सुनिश्चित करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. राज्यात मद्यपान व खरेदीसाठी यापुढे परवानगी असलेले वय 21 वर्षे हे असणार आहे.
कर्नाटक राज्य सरकारच्या आदेशानुसार मद्यपान व मद्य खरेदीसाठी ओळखपत्र तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. सर्व बार, पब, क्लब, लाउंज, ब्रुअरी, रेस्टॉरंट आणि मद्यपान सेवा देणाऱ्या आस्थापनांनी अधिकृत अहर्तता प्राप्त ओळखपत्राद्वारे वयाची पडताळणी करणे आवश्यक आहे. अल्पवयीन मद्यपानाच्या उल्लंघनासाठी मालक, व्यवस्थापक आणि परवानाधारक जबाबदार धरले जाईल. सीसीटीव्ही आणि अनुपालनाची कठोर अंमलबजावणी केली जावी. त्या अनुषंगाने सीसीटीव्ही नियमांवर देखरेख ठेवली जाईल. उल्लंघनासाठी कायदेशीर कारवाई केली जाईल. अल्पवयीन मद्यपानाविरुद्धच्या सरकारी आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पोलीस नोटीस बजावतील आणि संपूर्ण कर्नाटकात कठोर अनुपालन सुनिश्चित करतील.




