belgaum

धामणे गावात पाण्याचे दुर्भिक्ष; प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :धामणे (ता. जि बेळगाव) गावामध्ये सध्या पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले असून गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तरी प्रशासनाने आमच्या गावासाठी तात्काळ पाण्याची सोय करावी, अशी मागणी धामणेवासीयांकडून केली जात आहे.

बेळगाव शहरापासून अवघ्या 5 कि.मी. अंतरावर असलेल्या धामणे गावातील लोकांना सध्या पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाणी टंचाईमुळे गावकऱ्यांचे हाल होत असून सकाळी सकाळी प्रत्येक घरच्या संपूर्ण कुटुंबाला पाणी आणण्यासाठी पळापळ करावी लागत आहे.

बिचारी निष्पाप लहान मुलं देखील याला अपवाद नसून ही मुलं आपली छोटी सायकल घेऊन पाण्याच्या घागरी आणताना पहावयास मिळत आहेत. एकंदर स्त्री-पुरुष गावकऱ्यांना जिथे जिथे रस्त्याकडेला कुपनलिका खोदल्या आहेत तेथून म्हणजे जवळपास अर्धा कि.मी.वरुन घरी पाणी आणवे लागत आहे.

 belgaum

यावरुन पाण्याचे दुर्भिक्ष किती आहे याची कल्पना येऊ शकते. तरी याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन निदान लहान मुलांचे हाल पाहून तरी धामणे गावातील पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.