बेळगाव लाईव्ह : बेळगाव जवळील मण्णूर येथील एक एकर जमिनीवर अनधिकृतरीत्या ‘मारिया कृपा सोसायटी’ या नावाने बोर्ड लावण्यात आल्याने मण्णूर ग्रामस्थ आणि ‘देवसकी पंच कमिटी’ने या प्रकाराला कडाडून विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी एकत्र येत बैठक घेतली आणि प्रशासनाला लेखी निवेदन दिले.
मण्णूर गावामध्ये एकही नागरिक ख्रिश्चन धर्माचे पालन करत नाही, त्यामुळे ही जमीन ख्रिश्चन संस्थेला देण्यास आमचा तीव्र विरोध आहे, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी निवेदनात मांडली आहे.
यासंदर्भात मण्णूरचे तलाठी . महेंद्र पत्तार आणि आंबेवाडी ग्रामपंचायतीचे विकास अधिकारी चिदानंद जंबगी यांना लेखी निवेदन देऊन अनधिकृत मंजुरी रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदन देताना ‘देवसकी पंच कमिटी’चे चेअरमन मुकुंद भावकू तरळे, विनय कदम, नारायण कालकुंद्री, दत्तू चौगुले, रवी चौगुले, अरुण सांबरेकर, संदीप डोणकरी, संतोष केंचन्नावर, महादेव डोणकरी, निखिल चौगुले, रामा चौगुले, दशरथ मंडोळकर, मल्लाप्पा बाळेकुंद्री, उमेश चौगुले, मारुती मंडोळकर, अजित डोनकरी, सतीश बोंगाळे, अप्पू कटगी यांच्यासह मण्णूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




