बेळगाव लाईव्ह :सहा दशकांपासून जॅक्वार समूहाची विश्वासार्ह भागीदार असलेली बेळगावची हेडा सिरॅमिक्स उत्तर कर्नाटकातील पहिले आणि सर्वात मोठे ‘विशेष आर्टाइझ एक्सपिरीयन्स सेंटर’ सुरू करण्यासाठी सज्ज झाले असून सुमारे 3000 चौ.फू. क्षेत्रफळाच्या या केंद्रात लक्झरी वेलनेस उत्पादने, सॅनिटरीवेअर, फॉसेट्स, शॉवर्स आणि संपूर्ण बाथरूम सोल्युशन्स उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती हेडा सिरॅमिक्सचे प्रमुख विजयकुमार हेडा यांनी दिली.
खानापूर रोड बेळगाव येथील हेडा सिरॅमिक्सच्या कार्यालयामध्ये आज गुरुवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. विजयकुमार हेडा यांनी सांगितले की, ‘लाइफस्टाईल रिडिफाइन’ या तत्त्वज्ञानाच्या मार्गदर्शनाखाली हेडा सिरॅमिक्स हे घर मालक, वास्तुविशारद, इंटिरियर डिझायनर्स आणि बिल्डर्स यांना प्रीमियम उत्पादने उत्कृष्ट डिझाईन आणि दीर्घकालीन नातेसंबंधाच्या माध्यमातून सेवा देत आहे.
दुसरीकडे हेडा सिरॅमिक्सची भागीदारी असलेला सहा दशकांपूर्वी स्थापन झालेला जॅक्वार समूह हा बाथरूम आणि लाइटिंग सोल्युशन क्षेत्रातील जागतिक ब्रँड असून या समूहाने विविध ग्राहकांच्या गरजा अचूकतेने पूर्ण करण्याकरिता लक्झरी विभागासाठी ‘आर्टिझ’, प्रीमियम बाथ फिटिंग आणि लाइटिंग विभागासाठी ‘जॅक्वार’ आणि किफायशीर विभागासाठी ‘एस्स्को’ असे विविध श्रेणीतील आपले ब्रँड विकसित केले आहेत.
जॅक्वार समूहाशी 2005 पासून विश्वासार्ह भागीदार असलेली बेळगावची हेडा सिरॅमिक्स आता उत्तर कर्नाटकातील पहिले आणि सर्वात मोठे ‘विशेष आर्टाइझ एक्सपिरीयन्स सेंटर’ सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहे. सुमारे 3000 चौ.फू. क्षेत्रफळाच्या या सेंटरमध्ये लक्झरी वेलनेस उत्पादने, सॅनिटरीवेअर, फॉसेट्स, शॉवर्स आणि संपूर्ण बाथरूम सोल्युशन्स उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती देऊन जॅक्वार समूहाच्या परंपरेतून निर्माण झालेला ‘आर्टाइझ’ हा एक विशेष लक्झरी बाथ ब्रँड असून कलात्मक प्रेरणा आणि उत्कृष्ट कामगिरी यांच्या संगमातून बाथरूमच्या जागेला जीवनानुभवांमध्ये रूपांतरित करण्याच्या तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे.

या ब्रँडचे ‘बॉर्न फ्रॉम आर्ट’ हे घोषवाक्य कला आणि नाविन्य यांचा सुरेख मिलाफ दर्शवते. कालातीत डिझाईन, अचूक अभियांत्रिकी आणि उत्कृष्ट कार्यक्षमतेचे प्रतिक असलेले आर्टाइझ उत्पादने जागतिक स्तरावरील नामांकित डिझायनर्सच्या सर्जनशीलता नवकल्पना आणि कलात्मकतेच्या समतोलातून साकारलेली उत्कृष्ट कलाकृती आहेत, असे विजयकुमार हेडा यांनी पुढे स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेस विजयकुमार यांच्या चिरंजीवांसह जॅक्वार ग्रुपचे दक्षिण विभाग प्रमुख एम. टी. हेगडे, शाखा प्रमुख श्रीहरी गणेश, गटसल्लागार गौरव मल्होत्रा, टीम लीडर नागराज रायकर आर्टाइझचे वरिष्ठ व्यवस्थापक बी. जी. नंदिनी, एजीएम-आरएम संतोष कनवळ्ळी आणि आर्टाइझ ब्रँड मॅनेजर राधिका हे उपस्थित होते. पत्रकार परिषदेनंतर उपस्थित पत्रकारांना आर्टाइझची लक्झरी वेलनेस उत्पादने, सॅनिटरीवेअर, फॉसेट्स, शॉवर्स आणि संपूर्ण बाथरूम सोल्युशन्स दाखवून त्याबद्दल माहिती देण्यात आली.यावेळी विजयकुमार हेडा – मालक, हेडा सिरॅमिक्स
शरद हेडा – मालक, हेडा सिरॅमिक्स
एम. टी. हेगडे – झोनल हेड (दक्षिण विभाग)
श्री हरी गणेश – ब्रांच हेड, रिटेल कर्नाटक
गौरव मल्होत्रा – ग्रुप सल्लागार (Group Advisor)
पुनीत वर्मा – प्रमुख, आर्टाइझ उपस्थित होते.




