बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मोफत बस पास देण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे.
ही सुविधा राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेससाठी, तसेच एनडब्ल्यूकेआरटीसी द्वारे चालवल्या जाणाऱ्या बसेससाठी लागू असून या योजनेचा लाभ राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना मिळण्याची अपेक्षा आहे.
सदर योजनेअंतर्गत अर्जांची प्रक्रिया ‘सेवा सिंधू’ पोर्टलद्वारेच केली जाईल. यासाठी पात्रतेचे तसेच पास वितरणाचे सध्याचे नियम कायम राहतील. ज्या विद्यार्थ्यांनी ही योजना लागू होण्यापूर्वीच बस पाससाठी अर्ज केले होते आणि शुल्क भरले होते, त्यांना पूर्ण परतावा (रिफंड) दिला जाणार आहे.
या योजनेचा लाभ कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांतील अशा विद्यार्थ्यांनाही मिळेल जे शिक्षणासाठी शेजारील राज्यांमध्ये प्रवास करतात; तसेच कर्नाटकात शिक्षण घेणाऱ्या शेजारील राज्यांतील विद्यार्थ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे, हे विशेष होय.




