belgaum

अमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीवर पोलिसांचा छापा

0
Cop bgm
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील जुन्या बाजारपेठ भागात सार्वजनिक ठिकाणी स्कुटरवरून ‘हेरॉईन’ या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. मार्केट पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली असून आरोपींकडून अमली पदार्थ आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

मार्केट पोलिसांनी दुसरी कारवाई रूपम टॉकीज परिसरात केली. तिथे हेरॉईन विकण्याच्या तयारीत असलेल्या एका १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले, तर त्याचे इतर दोन साथीदार फरार झाले. या दोन्ही प्रकरणांतील एकूण ४ आरोपींवर मार्केट पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दुसऱ्या एका कारवाईत, बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एल. एस. जोडणवर आणि त्यांच्या पथकाने जांबोटी रस्त्यावरील मण्णी गावच्या हद्दीत छापा टाकला. विनापरवाना, अवैध दारूच्या १०० टेट्रा पॅकची विक्री करणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर अबकारी कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे.

 belgaum

अमली पदार्थ आणि अवैध दारू विक्री विरोधात तातडीने धाडसी कारवाया करणाऱ्या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या उपनिरीक्षकांसह, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त तसेच पोलीस उपायुक्तांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.