belgaum

‘‘डेड स्टोरेज’’च्या अवस्थेत पोचले हिडकल धरण

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :राज्यात पावसाने पाठ फिरवल्याने धरणं पाण्याशिवाय कोरडी पडत चालली असून सध्या बेळगाव जिल्ह्यातील बहुतेक धरणांनी रिकामी अवस्था गाठली आहेत. बेळगावच्या सर्वात मोठ्या धरणापैकी एक म्हणून ओळखली जाणारे हिडकल धरण ‘‘डेड स्टोरेज’’ अर्थात मृत साठ्याच्या अवस्थेत पोचले आहे.

फक्त बेळगावच नाही तर त्यासह बागलकोट जिल्ह्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या आणि शेतीच्या गरजेसाठी हिडकल धरण हेच आधारस्तंभ आहे. बेळगाव जिल्ह्याच्या हुक्केरी तालुक्यातील राजा लखमगौड हिडकल धरणाची एकूण क्षमता 51 टीएमसी असून सध्या या धरणात फक्त 5 टीएमसी पाणी शिल्लक आहे.

फक्त पिण्यासाठीच वापर केला तरही हा पाणी पुरवठा अवघा आणखी जवळपास एका महिन्यापुरताच टिकेल. बेळगाव शहर, हुक्केरी, संकेश्वर यांसह शंभराहून अधिक गावांची पाणी गरज याच धरणापासून पूर्ण होते. हिडकल धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेकडो गावांत पाणी संपल्यास लोकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल.

 belgaum

दरवर्षी जून महिन्याच्या सुमारास हे धरण सुमारे 50 टक्के भरलेले असायचे, परंतु या वर्षी वेळेवर पाऊस न झाल्याने सर्वच धरणाने तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. हिडकल धरण घटप्रभा नदीवर बांधण्यात आलेले असून महाराष्ट्रातील घाटात माथ्यावरून उगम पावून कर्नाटक राज्यात येणाऱ्या घटप्रभा नदीच्या पाण्यावर दोन जिल्ह्यांच्या हजारो गावांची लोकं अवलंबून आहेत.

धरणात पाणी कमी होत असल्यामुळे लोकांमध्ये चिंता पसरली आहे. गेल्या वर्षी 26 जून 2025 रोजी पाण्याची आवक 26,420 क्युसेक होती आणि त्या वेळी धरणात एकूण पाणी साठा 21.8 टीएमसी इतका होता. मात्र आता 26 जून 2026 रोजी पाण्याची आवक शून्य क्युसेक झाली असून धरणात पाण्याचा साठा फक्त 5.2 टीएमसी इतका शिल्लक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.