belgaum

गोकाकमध्ये राजकीय सुदीर्घ चर्चा;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: माजी मुख्यमंत्री आणि बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी आज गोकाक येथील एमएलसी लखन जारकीहोळी यांच्या गृहकार्यालयाला भेट दिली. स्थानिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गोकाक शहरात आले असताना त्यांनी जारकीहोळी यांच्या निवासस्थानी भेट दिली.

यावेळी माजी मंत्री आणि गोकाक मतदारसंघाचे आमदार रमेश जारकीहोळी यांच्यासोबत शेट्टर यांनी प्रदीर्घ चर्चा केली. सध्याचे राजकीय वातावरण, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पक्ष संघटना मजबूत करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे.

या भेटीमुळे गोकाकसह बेळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

 belgaum

यावेळी बेळगाव डीसीसी बँकेचे संचालक अमरनाथ जारकीहोळी यांचीही उपस्थिती होती.

जगदीश शेट्टर आणि रमेश जारकीहोळी यांच्यातील या सुदीर्घ चर्चेत नेमकी कोणती राजकीय रणनीती ठरली, याबाबत आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.