belgaum

एस्ट्रोटर्फ मैदानासाठी खासदार कॅटोंमेंट अधिकारी,हॉकी संघटना बैठक

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह | बेळगावमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे एस्ट्रोटर्फ हॉकी मैदान उभारण्यासाठी महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुदाम मंचनवार आणि ‘हॉकी बेळगाव’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

सकल मराठा समाजाचे नेते तथा भाजपचे ज्येष्ठ नेते किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली ‘हॉकी बेळगाव’च्या पदाधिकाऱ्यांनी खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन बेळगावमध्ये एस्ट्रोटर्फ हॉकी मैदान उभारण्याबाबत सविस्तर चर्चा केली.

यावेळी खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया’ योजनेअंतर्गत युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाकडून मैदानासाठी आवश्यक निधी व मंजुरी मिळवून देण्यासाठी स्वतः दिल्ली स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. बेळगावला भव्य हॉकी मैदान मिळावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

 belgaum

कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ सुदाम मंचनवार यांनीही या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्याची ग्वाही दिली. बैठकीला कॅन्टोन्मेंटचे कार्यकारी अभियंता सतीश मन्नूरकर उपस्थित होते. प्रस्तावाच्या तांत्रिक बाबींची जबाबदारी त्यांच्याकडे राहणार आहे.

बैठकीत ‘हॉकी बेळगाव’चे सचिव सुधाकर चाळके यांनी शहरात एस्ट्रोटर्फ हॉकी मैदानाची गरज अधोरेखित केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष गोळाप्पा होसमणी, निवृत्त जवान व प्रशिक्षक उत्तम शिंदे, नामदेव सावंत, प्रकाश कालकुंद्रीकर, सागर पाटील, प्रकाश बेळगोजी, कविता वेसणे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

बेळगावला हॉकीची समृद्ध परंपरा लाभली असून, आधुनिक एस्ट्रोटर्फ मैदान उभारल्यास नव्या पिढीतील खेळाडूंना मोठी संधी मिळेल. या प्रकल्पामुळे बेळगाव पुन्हा एकदा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हॉकी नकाशावर झळकेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.